भटक्या
#exploringSahyadri
Thank you for visiting our new website! We're thrilled to have you explore our online space. Your interest and support mean the world to us.
#exploringSahyadri
A residental place of Valmiki rushi
State animal of Maharashtra
Sahayadri phool Utsov in locality of Ratangad
Author and Traveler (Founder of Bhatkya)
आपले स्वागत आहे. प्राचिन स्थापत्य पराक्रमी इतिहास, साहस आणि वैभवशाली प्राकृतिक सौंदर्याच्या एका अनोख्या वाटेवर! आपल्याला नव्याने परिचित होणार्या 'भटक्या' अरविंदा सोबत. अरविंदा सोबत आपण महाराष्ट्राच्या सह्याद्री पर्वतरांगेतील पराक्रमी इतिहासाचे प्रथम साक्षीदार असलेल्या अपरिचित किल्ल्यांच्या प्रेरणादायी इतिहासाच्या कोनात्याही पानात जाऊन त्याच्या अनुभवांचा साक्षात्कार करू शकता. सह्याद्रीच्या कुशीतील अप्रतिम प्राकृतिक सौंदर्य, तेथील प्रकृतिपूजक आदिम संस्कृती व लोकजीवन यांचा 'भटक्या' अरविंदा सोबत अनुभव घेऊ या. सह्याद्रीच्या या प्राचीन ऐतिहासिक, प्राकृतिक अद्वितीय दुनियेत आपणही सहकुटुंब सहभागी व्हा आणि सह्याद्रीची श्रीमंती अनुभवा. महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या या सुंदर दृश्यांच्या संग्रहात आनंद घेण्याची संधी मिळवा.
भटक्यांची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या प्रकृतिसंपन्न सह्याद्रीच्या भागात डोळ्यांना सुखावणारी प्रसन्नता व मनाला हवीहवीशी वाटणारी संपन्नता आहे. येथील स्वच्छ प्रदूषणविरहित हवा, मनाला शांतता व गारवा देणारी वनसंपदा, तनाला बळकटी देणारी माती. पर्यटनातून हे सर्व अनुभावयचे असल्यास या माहितीचा आपल्याला नक्कीच उपयोग होईल.